Dharma Sangrah
✕

43 वर्षात 53 लग्नं, परदेशी महिलांनाही केली बायको! खूप विचित्र कारण

Updated: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (15:23 IST)
 
गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियामध्ये राहणारे 63 वर्षीय अबू अब्दुल्ला सध्या खूप चर्चेत आहे. याचे कारण त्यांचे लग्न आहे. या व्यक्तीने एक-दोन नव्हे तर 53 विवाह केले आहेत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण अबूला हे आश्चर्यकारक वाटत नाही. त्यांचे लग्न करण्याचे कारणही विचित्र आहे. न्यूज वेबसाईटशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी 53 वेळा लग्न आपल्या आनंदासाठी किंवा फक्त नाते निर्माण करण्यासाठी केले नाही तर आयुष्यात संतुलन आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी केले.
 
पहिले लग्न वयाच्या 20 व्या वर्षी झाले
रिपोर्टनुसार, अबू जेव्हा 20 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी पहिले लग्न केले होते. त्यांची पहिली पत्नी त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी होती. ते आनंदी होते, त्यांना मुलंही होती, पण काही दिवसांनी त्यांच्यात आणि त्यांच्या बायकोमध्ये भांडणे सुरू झाली. त्यानंतर त्याने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. मात्र त्यानंतर त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. ही गुंतागुंत टाळण्यासाठी त्यांनी तिसरे आणि नंतर चौथ्यांदा लग्न केले. त्या महिलांमध्ये भांडण जास्त झाले, तेव्हा अबूने पहिल्या तीन पत्नींना तलाक दिला.
 
काही विवाह फक्त 1 रात्र चालले
गल्फ न्यूजशी बोलताना अबू यांनी सांगितले की, ते खूप लग्ने करत आहे कारण त्याला स्वतःसाठी एक परफेक्ट पत्नी हवी होती जी त्यांना समजून घेईल आणि त्यांना आनंदी ठेवेल. ते प्रत्येक पत्नीशी चांगले वागायचे. 43 वर्षात त्यांनी केवळ सौदी महिलांशीच नाही तर परदेशी महिलांसोबतही विवाह केले. ते 3-4 महिने बिझनेस ट्रीपला जायचे आणि तिथल्या महिलांना भेटायचे. लग्न न करता चुकीच्या कामात अडकण्याची भीती न बाळगता ते तिच्याशी लग्न करायचे. अबू यांचे सर्वात लहान लग्न फक्त 1 रात्र चालले होते. आता ते 1 महिलेसोबत लग्नाच्या बंधनात अडकले असून त्यानंतर त्यांना दुसरे लग्न करायचे नाही.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

पुढील लेख
Show comments