शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (18:37 IST)

China Telecom Building: चांगशा येथील चायना टेलिकॉम इमारतीला आग

A massive fire broke out at the dozen-story China Telecom building in Changsha
चीनच्या दक्षिणेकडील हुनान प्रांताची राजधानी चांगशा शहरातील डझन मजली चायना टेलिकॉम इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही इमारत 200 मीटर (656 फूट) पेक्षा जास्त लांब असल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या वेळी आकाशात दाट धुराचे लोट दिसत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. राज्य माध्यमांनी सांगितले की मृतांची संख्या "सध्या अज्ञात" आहे. राज्य प्रसारित सीसीटीव्हीने अहवाल दिला की, "घटनास्थळावरून दाट धूर निघत आहे आणि अनेक डझन मजले जळत आहेत." यासोबतच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू केल्याचे सांगण्यात आले.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि घटनास्थळी बचाव कार्यही सुरू करण्यात आले. दरम्यान, चायना टेलिकॉमने सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांगशा येथील आमच्या नंबर-2 कम्युनिकेशन टॉवरला आज दुपारी साडेचार वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. आग विझवण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी 36 फायर ट्रक आणि 280 अग्निशमन दल घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये टॉवरच्या बाहेरचा भाग पूर्णपणे काळे झाल्याचेही दिसून आले आहे.