सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: अबुधाबी , शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (12:57 IST)

बंगळुरू-राजस्थान आज तिसर्या विजयासाठी प्रयत्नशील

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (शनिवारी) आयपीएलच्या सत्रातील पंधरावा सामना खेळला जाणार आहे. हे दोघेही आपल्या तिसर्यात विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील.
 
बंगळुरू आणि राजस्थान यांचे आतापर्यंत तीन सामने झाले असून दोघांनीही दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाची चव चाखली आहे. बंगळुरूने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुध्द सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला आहे तर राजस्थानने कोलकाताविरुध्द पराभव पत्करला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ही लढतही रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.
सामन्याची वेळ दुपारी 3.30 वाजता.