Biodata Maker marathi
✕

दिल्लीचा पंजाबवर 7 गडी राखून विजय

Updated: सोमवार, 3 मे 2021 (08:24 IST)
 
पंजाबच्या 167 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सामनावीरचा मान पटकावलेला फिरकीपटू हरप्रीत ब्रार पुन्हा एकदा पंजाबसाठी धावून आला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पृथ्वीची दांडी गुल केली. पृथ्वीने 3 चौकार व 3 षटकारांसह 39 धावांची खेळी केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला साथीला घेत शिखर धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. रिले मेरिडिथने स्मिथला 24 वर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. विजयाच्या जवळ पोहोचताना ऋषभ पंतने मोठा फटका खेळण्याच्या नादात आपला बळी दिला. पंतनंतर शिमरोन हेटमायरने 4 चेंडूत 16 धावा कुटत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली.
 
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या. के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत प्रभासिमरन सिंगसह कर्णधार मयंक अग्रवालने सलामी दिली. मात्र, दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने प्रभासिमरनला 12 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. रबाडाने गेलचा त्रिफळा उडवला. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या डेव्हिड मलानने अग्रवालसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू अक्षर पटेलने मलानची दांडी गुल करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतर मयंकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने एका बाजूने संघाला सावरले. मयंकने 58 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह 99 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी टिपले. आवेश खान व अक्षरला प्रत्येकी 1 बळी घेता आला.
आजचा सामना
कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
वेळ ः सायंकाळी 7.30 वाजता.
इथे पहा लाइव्ह ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व हॉटस्टार.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments