गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:29 IST)

CSK vs KKR Live Score: चेन्नई सुपर किंग्जने KKRसमोर ठेवलं १३२ धावांचे लक्ष्य, धोनीचे नाबाद अर्धशतक

dhoni
IPL-2022 1st Match, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Score and Updates: इंडियन प्रीमियर लीग (IPL-2022)चा 15वा सीझन आजपासून सुरू झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR)सीझनच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने आहेत. केकेआरचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे.
 
धोनीच्या नाबाद अर्धशतकाने चेन्नईने केकेआरला दिले 132 धावांचे लक्ष्य
CSK vs KKR Live Score, IPL 2022 Live Updates: महान यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद अर्धशतकामुळे चेन्नई सुपर किंग्जने IPL-2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 131 धावा केल्या. . धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या तर कर्णधार रवींद्र जडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावांचे योगदान दिले. दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी नाबाद 70 धावांची भागीदारी केली. केकेआरकडून वेगवान गोलंदाज उमेश यादवने 2 तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलने 1-1 बळी घेतला.