शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2017 (11:34 IST)

बीएसएनएल ग्राहकांनो आपला मोडेम पासवर्ड लवकर बदला

सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल ने  आपल्या इंटरनेट वापरत असलेल्या ग्राहकांना  तुरंत  पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे.  बीएसएनएलच्या एका सेक्शनवर मालवेअरचा हल्ला झाला आहे. त्यामुळे आता याचा मोठा परिणाम दोन हजार मोडेमवर झाला आहे.या मॉडेमवर मालवेअरचा हल्ला   डिफॉल्ट पासवर्ड न बदलल्याने झाल्याचे निदर्शनास आले आहे.
 

बीएसएनलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांच्या माहिती दिली आहे.  आम्ही मालवेअर हल्ल्याविरोधात सामना करत आहोत. मात्र आम्ही असे सुचवतो की  आपापले पासवर्ड तातडीने बदला. एकदा पासवर्ड बदलल्यानंतर यूझर्सने कसलीही काळजी करु नये असे श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

मात्र यामध्ये बीएसएनलच्या कोअर नेटवर्क, बिलिंग किंवा अन्य प्रणालीवर मालवेअरचा हल्ला झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  बीएसएनएलच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून यूझर्सना योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.