गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (17:16 IST)

स्मार्ट बँड खरेदी करताय?

सध्या स्मार्ट बँडचा जमाना आहे. तुम्ही तुमच्या फिटनेसबाबत सजग असाल तर हा स्मार्ट बँड खूप उपयोगी पडू शकतो. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवण्यापासून अगदी चाललेली पाऊलं मोजण्यापर्यंत स्मार्टबँड बरंच काही करतो. या स्मार्टबँडमध्ये वेगवेगळे मोड्‌स असतात. तुम्ही खेळताना, व्यायाम करताना, पोहताना हा बँड वापरू शकता. तुम्ही किती कॅलरी खर्च केल्या हे हा बँड सांगू शकतो. तुम्हीही स्मार्टबँड खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या गोष्टी नक्की विचारात घ्या.
* बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टबँड उपलब्ध आहेत. प्रत्येक बँडची वैशिष्ट्ये, सुविधा वेगवेगळ्या असतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँड निवडायला हवा. यासाठी बँडची वैशिष्ट्ये आधी जाणून घ्या.
* ई कॉमर्स साईट्‌सवरही स्मार्टबँडविक्रीसाठी उपलब्ध असतात. काही बँड्‌सवर भरपूर सवलत दिली जाते तर काही कमी किमतीत मिळतात. मात्र असे बँड्‌स कमी दर्जाचे असू शकतात. त्यामुळे शक्यतो कंपनीच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइनेआउटलेटमधूनच स्मार्ट बँड विकत घ्या. तसंच सर्व बाबींची तपासणी करूनच ऑनलाइन बँड विकत घ्या.
* अनेकवेळा कंपन्या स्मार्ट बँडची सुधारित आवृत्ती बाजारात आणतात. अशावेळी नव्या बँडमध्ये काही मोजके नवे फीचर समाविष्ट केले जातात. अशा फीचर्सची गरज नसेल तर तुम्ही जुनं मॉडल विकत घेऊ शकता.