रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (09:03 IST)

व्हॉट्सअॅपला आले ‘फिंगरप्रिंट लॉक’

व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवं फिचर घेऊन येत आहे. या फिचरमुळे तुमचं चॅट आणखी सुरक्षित होणार आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.
 
व्हॉट्सअॅपच्या ‘फिंगरप्रिंट लॉक’ मुळे आता व्हॉट्सअॅपवरील चॅट सुरक्षित राहणार आहेत. एखादी व्यक्ती काही खासगी गोष्टी व्हॉट्सअॅपवर एखाद्याला पाठवते. तसेच पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीचा फोन दुसऱ्याच्या हातात असल्याने तो मेसेज वाचला देखील जाऊ शकतो. त्यामुळे तो मेसेज सुरक्षित राहिलंच असं सांगता येत नाही. मात्र आता व्हॉट्सअॅपच्या नवीन ‘फिंगरप्रिंट लॉक’ मुळे ही भिती राहणार नाही. ‘फिंगरप्रिंट लॉक’ फिचमुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय त्या व्यक्तीचे व्हॉट्सअॅप कोणालाही उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे. या फिचरसह व्हॉट्सअॅपकडून इतरही काही फिचर्स आणली जाणार आहेत.