रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (10:42 IST)

टिकटॉक वापरत आहात मग या १० गोष्टी कायम लक्षात ठेवा

यातील सर्जनशीलता आणि सहज स्वीकार होण्यासारखी संकल्पना यामुळे टिकटॉकने भारतातील लक्षावधी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तरुणांमध्ये असलेल्या लोकप्रियतेचा विचार करून टिकटॉकने (tiktok) त्यांना स्वत:चे मनोरंजन करत असतानाच स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षितताविषयक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. टिकटॉकचा वापर करत असताना स्वत:ला व आपल्या लहानग्यांना सुरक्षित ठेवण्याचे १० मार्ग खालीलप्रमाणे आहेत :
 
१) एज गट – या वैशिष्ट्यामुळे केवळ १३ वर्षांवरील लोकांनाच या अॅपवर आपले अकाउंट तयार करणे शक्य होते, ज्यामुळे समज नसलेल्या लहान मुलांना या व्यासपीठाचा वापर करण्यापासून रोखता येते.
 
२) स्क्रीन टाइम मॅनेजमेंट – यामुळे वापरकर्त्यांना या अॅप्लिकेशनचा वापर ४०, ६०, ९० आणि १२० मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवता येतो. निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ वापर करायचा असल्यास पुन्हा पासवर्ड टाकून नव्याने सत्र सुरू करावे लागते.
 
३) रिस्ट्रिक्टेड मोड – मशिन-लर्निंग आर्टिफिशिअल इंटलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून लहान मुलांच्या वयाला अनुरूप नसेल अशा कंटेंटला चाळणी लावण्यात येते. हे अकाउंट सेटिंग वापरकर्त्याच्या इच्छेवर अवलंबून असून कशा प्रकारचा कंटेंट बघायला आणि प्राप्त करायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य यामुळे वापरकर्त्याला मिळते.
एकदा या पर्यायाचा स्वीकार केल्यानंतर त्यात बदल करायला असेल तर त्यासाठी पासवर्डचा वापर अनिवार्य आहे.
 
४) इन-अॅप सुसाइड प्रीव्हेन्शन – हे वैशिष्ट्य वापरकर्त्याला मदतीच्या पानावर घेऊन जाते, जिथे अनेक उपयुक्त सूचना आणि वापरकर्त्याला मदत मिळवण्यासाठी आवश्यक हॉटलाइन्स उपलब्ध आहेत.
 
५) कमेंट फिल्टर फीचर – या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्याला इंग्रजी आणि अन्य स्थानिक भाषांमधील कमेंट्समधील ३० शब्द ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळते. या शब्दांची यादी कधीही बदलता येते.
 
६) फॅमिली पेअरिंग – डिजिटल वेलबिइंग मोडचा भाग असलेल्या फॅमिली पेअरिंग या वैशिष्ट्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांसाठी टिकटॉकवरील स्क्रीन टाइमची मर्यादा ठरवण्याचा अधिकार मिळतो, रिस्ट्रिक्टेड मोड लागू करता येतो आणि थेट संदेशांवरही निर्बंध आणता येतात. यामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या टिकटॉकच्या वापरावर नियंत्रण ठेवता येते.
 
७) इन-अॅप रिपोर्टिंग – एखाद्या व्हिडिओमुळे समूह मार्गदर्शक तत्त्वांचे (कम्युनिटी गाइडलाइन्स) उल्लंघन होत आहे, असे वाटल्यास वापरकर्ते या वैशिष्ट्यामुळे अशा व्हिडिओबाबत तक्रार करू शकतात. या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते आणि चुकीच्या कंटेंटबाबत जागरुकता निर्माण करून टिकटॉकला सुरक्षित आणि सकारात्मक ठेवण्यासाठी त्यांची मदत होते. सध्याच्या जागतिक साथीच्या काळात कुठल्याही फसव्या अथव्या चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये, यासाठी टिकटॉकने मिसलिडिंग इन्फर्मेशन अर्थात दिशाभूल करणारी माहिती या श्रेणीद्वारे इन-अॅप रिपोर्टिंग अधिक सक्षम केले आहे.
 
८) प्रायव्हसी सेटिंग्ज – याद्वारे वापरकर्त्यांना पुढील गोष्टी करणे शक्य होते :
आपल्याला कोणी फॉलो करायचे ते ठरवता येते
कोणी कमेंट करायचे ते ठरवता येते
आपल्या व्हिडिओवर कोणी व्यक्त व्हायचे ते ठरवता येते
ड्युएटमध्ये कोणी भाग घ्यायचा ते ठरवता येते
कोण संदेश पाठवू शकतो ते ठरवता येते
अयोग्य कंटेंट डाउनलोड होणे टाळता येते
ब्लॉक लिस्ट तयार करता येते व तीत बदल करता येतो
 
९) डिव्हाइस मॅनेजमेंट – या वैशिष्ट्याचा वापर करून वापरकर्ते टिकटॉक अॅपमधून अन्य डिव्हाइसेसमधील आपले सत्र समाप्त करू शकतात किंवा अकाउंट रद्द करू शकतात. यामुळे त्यांना त्यांच्या अकाउंटच्या सुरक्षिततेची अधिक खबरदारी घेणे शक्य होते. अकाउंटचा गैरवापर टाळणेही यामुळे शक्य होते.
 
१०)  रिस्क वॉर्निंग टॅग – एखादा व्हिडिओ सर्वसाधारणपणे बघण्याच्या योग्यतेचा नाही, अशा प्रकारची सूचना याद्वारे वापरकर्त्याला मिळते.