सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

मायक्रोसॉफ्ट आणणार मॉडर्न की बोर्ड

Microsoft modern keyboard
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या लेटेस्ट डेस्कटॉपसाठी ब्ल्यू टूथ की बोर्डवर संशोधन केले असून हा की बोर्ड स्पेशल असेल. म्हणजे त्याच्यावर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. मायक्रोसॉफ्टने त्याचे नामकरण मॉडर्न की बोर्ड असे केले असून त्याचे कोडनेम आहे सी 3 के 1780. शांघाय येथे होत असलेल्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये या की बोर्डचे प्रात्यक्षिक दिले जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. विंडोज टेन पुशसह हा की बोर्ड फिट करण्याची कंपनीची योजना आहे. हा की बोर्ड सरफेस की बोर्डप्रमाणेच असेल.
 
गतवर्षी सरफेस की बोर्ड सरफेस स्टुडिओच्या सहकार्यांने कंपनीने लॉन्च केला होता. मॉडर्न की बोर्डमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर न्यूमॅरिक की पॅडच्या आसपास फिट केला जाईल असे सांगितले जात आहे.
 
यामुळे यूजरला हार्डवेअर की बोर्ड वापरताना अडचण येणार नाही. या की बोर्डमध्ये काही नवी फीचर्सही दिली जातील.