सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

नवीन मोबाईल कनेक्शनसाठी ई-केवायसीचतून ग्राहक पडताळणी

नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार आहे. आता ई-केवायसीच्या माध्यमातून ग्राहकाची पडताळणी होईल, त्यानंतरच नवीन मोबाईल कनेक्शन घेता येईल. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या नव्या नियमावलीत ई-केवायसीची सक्ती करण्यात आली आहे. फक्त नवीन कनेक्शन घेतानाच नाही, तर जुन्या मोबाईल कनेक्शनधारकांनाही ई-केवायसीच्या माध्यमातून आपला नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड सर्वच मोबाईल कनेक्शन धारकांना ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना 6 फेब्रुवारी 2018 ची मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जर व्हेरिफिकेशन करता आलं नाही, तर मोबाईल कनेक्शन बंद केलं जाईल.