बजेटमधला स्मार्ट टीव्ही
दाईवा'ने आपला 43 इंची स्मार्ट टीव्ही बाजारात उतरवला आहे. यात बिल्ट इन अॅ्लेक्सा आणि स्मार्ट कंट्रोल अशी फिचर्स आहेत. यातल्या इन बिल्ट अॅलेक्सामुळे तुम्हाला घरातली उपकरणे चालू, बंद करता येतील. घरात स्मार्ट एसी, सीसीटीव्ही, पंखे असतील तर उठून बंद करण्याची गरज भासणार नाही.
अॅलेक्सा हिंदी जाणत असल्यामुळे हिंदीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतील. सर्च लेटेस्ट बॉलिवूड मूव्हीज, रिमाईंड मी अबाउट माय मीटिंग इन 30 मिनिट्स अशा काही कमांड्स देता येतील. हा स्मार्ट टीव्ही कोणत्याही अॅयलेक्सा एनेबल्ड उपकरणाला कनेक्ट होऊ शकतो. इको स्मार्ट स्पीकर्स किंवा अॅमलेक्सा अॅयपला हा टीव्ही कनेक्ट करता येईल. टीव्ही परवडणार्या् दरात उपलब्ध आहे.
अजय तिवारी