रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (11:23 IST)

'स्टेटस टॅब' हे व्हॉट्स अॅपचे नवं फीचर !

व्हॉट्स अॅपचं सध्या ‘स्टेटस टॅब’वर काम सुरु आहे. नुकतंच व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केल्यानंतर आता व्हॉट्स अॅपचं नवं इंटरफेज समोर आलं आहे.
 
या स्टेटस बारमुळे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टसोबत तुमचा फोटो निश्चित वेळेपर्यंत शेअर करु शकता. हे फीचर बरचंस इंस्टाग्रामचं स्टोरी आणि स्नॅपचॅटच्या स्टोरीसारखं आहे.
 
ज्यामध्ये फोटो क्लिक करुन त्यात टेक्स्ट आणि इमोजी अॅड करु शकतो. हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना एका निश्चित वेळेपर्यंत दिसेल.
 
यासोबतच यूजर आपलं स्टेट्स काही मोजक्या लोकांसाठी ठेऊ शकतो. किंवा सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी ठेऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपनं आपलं व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.