शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (12:44 IST)

आता व्हाईस कॉलवरून बिनधोक जा व्हिडिओ कॉलवर!

व्हॉट्स अॅपने युजर्सला आकर्षिक करण्यासाठी आणि स्वत:शी निगडित ठेवण्यासाठी अनेक नवनवे फिचर्स आणले. व्हिडिओ कॉलिंगची सोय निर्माण केल्यानंतर तर व्हॉट्स अॅप अधिकच लोकप्रिय झाले. आता यामध्येही आणखी सुधारणा करणारे ऊक फिचर आणले जाणार आहे. या फिचरमुळे युजर्सचा व्हॉईस कॉल सुरू असताना तो व्हिडिओ कॉलवर स्वीच करू शकणार आहे. म्हणजेच आता व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होताना तुमचा कॉल बंद होणार नाही. अर्थातच कॉल डिस्कनेक्ट करण्‍याचीही गरज पडणार नाही. सध्या व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होण्याचे फिचर नाही. त्यामुळे आपण व्हॉईस कॉल केला असेल आणि अचानक आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा असल्यास आधी व्हॉईस कॉल डिस्कनेक्ट होतो आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल करावा लागतो. आता आपण थेट व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये जाऊ करू शकणार आहोत. सद्या बीटा व्हर्जनवर याचे टेस्टिंग सुरू आहे. व्यवसाय उदीम करणारे लोक आणि त्यांचे ग्राहक यांच्यामधील संवादासाठीही व्हॉटस् अॅप एक नवे फिचर बनवत आहे.