बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2019 (17:33 IST)

व्हाट्सएपचा हा उत्कृष्ट फीचर आयफोनवर देखील उपलब्ध

फेसबुक मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएपने गुरुवारी सांगितले की आता ऍपल आयफोन वापरकर्ते देखील 'व्हाट्सएप बिझिनेस' अॅप वापरण्यास सक्षम असतील. पूर्वी ते केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होतं. हा अॅप उद्योजकांना लक्षात ठेवून बनवलं गेलं आहे. व्हाट्सएपने वक्तव्यात म्हटले आहे की लहान व्यापार्‍यांकडून वारंवार विनंत्या येत होत्या की ते त्यांच्या आवडीच्या डिव्हाईसवर 'व्हाट्सएप बिझिनेस' अॅप वापरू इच्छित आहे. आता ते हे करू शकतात.
 
अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी व्हाट्सएपने गेल्या वर्षी, 'व्हाट्सएप बिझिनेस' अॅप सादर केला. याद्वारे कंपन्या ग्राहकांशी संपर्क साधू शकतात आणि लाखो वापरकर्ते व्यवसाय युनिटशी बोलू शकतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्मने गुरुवारी एका वक्तव्यात म्हटलं की 'व्हाट्सएप बिझिनेस' अॅप ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, भारत, मेक्सिको, युके येथे अॅप स्टोअरवरून विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल आणि आगामी आठवड्यांमध्ये, हे इतर देशांसाठी देखील उपलब्ध होईल. 
 
'व्हाट्सएप बिझिनेस' अॅपला अँड्रॉइड व्हर्जनप्रमाणे ऍपल ऍप स्टोअर वरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकेल. यामध्ये, ग्राहक आणि लहान व्यवसाय युनिट्सचे एकमेकांशी संपर्क साधनांसाठी फीचर्स सामील राहतील.