मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (13:26 IST)

स्कूल बसच्या इंजिनमध्ये महाकाय अजगर

यूपीच्या रायबरेलीमध्ये एका स्कूल बसमध्ये महाकाय अजगर सापडल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बसमध्ये एवढा मोठा अजगर पाहून लोकांना आश्चर्य वाटले. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने पोहोचून अजगराला बाहेर काढले. या बचावकार्यासाठी टीमला सुमारे एक तास लागला. सुदैवाने रविवार असल्याने शाळा बंद होती नाहीतर मोठी अनुचित घटना घडू शकली असती. 
 
असे सांगितले जात आहे की शनिवारी शाळेचे वाहन जवळच्या गावात पार्क केले जाते. सोमवारी ती तिथून मुलांना घेऊन येते. कालही गावात वाहन उभे असताना शेळीचे पिल्लू खाऊन अजगर वाहनावर चढताना ग्रामस्थांना दिसला. ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापनाला कळविले होते. त्यानंतरच वाहन गावातून शाळेसमोर आणण्यात आले व त्यानंतर जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली.जिल्हा प्रशासनाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून अजगराची सुटका करून घेतली.  तासाभराच्या प्रयत्नानंतर अजगराला बाहेर काढता आले. रविवार असल्याने शाळा बंद होती, त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही. 
 
या घटनेबाबत रायबरेलीचे शहर दंडाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी सांगितले की, रायन स्कूल बसमध्ये अजगर घुसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर मी टीमसोबत.पोहोचले . त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली आणि वनविभागाच्या पथकाने अजगराला बाहेर काढले. तसेच, त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.  
 
Edited By - Priya Dixit