suvichar

चक्क शेतात सापडला हिरा!

गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (00:16 IST)
मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना जिल्ह्यातील एकाशेतकर्‍याला आपल्या शेतात 12 कॅरेट 58 सेंटचा हिरा सापडला आहे. त्याची अंदाजे किंमत 30 लाख रुपये आहे. या हिर्‍याच्या लिलावानंतर आता हा गरीब शेतकरी लक्षाधीश बनेल. जिल्हा खनिज व हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, प्रकाश कुमार शर्मा नावाच्या शेतकर्‍याला सरकोहा गावातील आपल्या शेतात हा हिरा सापडला. त्याची खरी किंमत किती आहे हे लिलावानंतरच स्पष्ट होईल. या शेतकर्‌याने हा हिरा जिल्ह्याच्या हिरा कार्यालयात जमा  केला. आता या हिर्‍याला लिलावात ठेवण्यात येणार आहे. तिथे दर तीन महिन्यांनी हिर्‍यांचा लिलाव केला जातो. या हिर्‍याचा लिलाव झाल्यावर 12 टक्के रॉयल्टी आणि अन्य कर कापून जे पैसे येतील ते सर्व या शेतकर्‍याला मिळतील. विशेष म्हणजे ज्या शेतात हा हिरा सापडला ते शेत केदारनाथ रैकवार नावाच्या शेतकर्‌याचे असून प्रकाश कुमारने ते रितसर भाड्याने घेतलेले आहे!

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: ठाकरे गटाचे भवितव्य उद्या सकाळी ११ वाजता ठरणार

वैभव सूर्यवंशीच्या संघाने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवली तातडीची बैठक; दोन बंडखोर खासदारांच्या परत येण्याबद्दलच्या चर्चांना जोर चढला

फादर्स डे 2026: वडिलांना आनंदी ठेवण्यासाठी करा या 5 छोट्या गोष्टी

चोराने नोजल उघडेच ठेवले! कर्मचारी झोपले राहिले; ३०० लिटर पेट्रोल जमिनीवर सांडले; वाशिम मधील घटना

पुढील लेख
Show comments