1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (16:09 IST)

क्रिकेटच्या सामन्यामुळे सानिया मिर्झा अचानकपणे ट्विटरवरून गायब

Sania Mirza
आशिया कपमध्ये  भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेटचा सामना रंगणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिकची पत्नी भारतीय टेनिस प्लेअर सानिया मिर्झाने अचानकपणे ट्विटरवरून गायब झाली आहे. तिने स्वतः याची घोषणा केली असून Ind vs Pak सामना हेच याचं कारण आहे.  
 
पहिल्या दिवशी भारत विरूद्ध हाँगकाँगसोबत झाला. ज्यामध्ये भारताचा विजय झाला आहे. आता आज  भारत विरूद्ध पाकिस्तान एकमेकांविरोधात भिडणार आहे. भारतीय टेनिस प्लेअर सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिबसोत लग्न केलं. या लग्नाला दोन्ही देशांकडून खूप विरोध झाला. मात्र हे कपल एकमेकांसाठी लोकांच्या विरोधात कायम उभे राहिले आहेत. यासाठी सानियाने या मॅचच्या अगोदरच मोठा निर्णय घेतला. सामना झाल्यावर ट्रोल होण्यापेक्षा तिने या दिवसांत ट्विटरवरून दूर राहणं बंद केलं आहे. सानियाने या सामन्यासाठी 24 तास अगोदर ट्विट केलं आहे.