शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 10 मे 2018 (12:29 IST)

रेल्वेतील खान-पानावर जीएसटी

रेल्वेतील खान-पानासाठी आता जास्त जीएसटी भरावा लागणार आहे. रेल्वे डब्यात प्रवासादरम्यान विकल्या जाणाऱ्या खाद्य-पेयांवर यापुढे १८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) लावला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीच्या अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने(एएआर) घेतला आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या खाद्य-पेयांवर सवलतीच्या दरात ५ टक्के जीएसटी लावण्यात येत होता.

मात्र, रेल्वे ही वाहतुकीचे साधन आहे, रेल्वेला कँटिन अथवा रेस्टॉरंट मानता येणार नाही. त्यामुळे अशा खाद्य-पेयांवर पूर्ण १८ टक्के जीएसटी लागेल. ही सेवा नाही, त्यामुळे ही विक्री/वस्तू पुरवठा जीएसटीच्या पूर्ण दरास पात्र आहे, असं अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने म्हटलं आहे. सोबतच प्लटफॉर्मवर विक्री होणा-या प्रत्येक पदार्थांवर वेगवेगळा जीएसटी दर  आहे. तसंच थंड किंवा गरम करुन सामानाच्या विक्रीवरही टॅक्समध्ये सूट मिळणार नाही.