Marathi Biodata Maker
✕

मला दत्तक घेत आहेत, तुम्ही यायचंच': 5 वर्षांच्या मुलाचं मित्रांना आमंत्रण

Updated: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (16:18 IST)
 
केंट काउंटी कोर्टाने फेसबुकवर या सुनावणीचा एक फोटो शेअर केला आहे. यात पाच वर्षांचा मायकल मोठ्यांसाठीच्या एका खुर्चीत आरामात बसलेला दिसतोय. त्याच्या शेजारीच त्याचे नवीन आई-वडील आहेत. आणि या तिघांच्या मागे मायकलचे सर्व चिमुकले वर्गमित्र हातात कागदापासून बनलेले हार्ट्स उंचावून त्याच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहेत.
 
या दत्तक सुनावणीत प्रत्येक मुलाने आपण इथे का आलोय, हे न्यायमूर्तींना सांगितलं.
 
स्टिव्हन नावाचा मुलगा म्हणला, "मायकल माझा बेस्ट फ्रेंड आहे."
 
तर एक चिमुकली म्हणाली, "माझं नाव लिली आहे आणि मायकल मला आवडतो."
 
या खास सुनावणीसाठी केंट काउंटी कोर्टाच्या न्यायमूर्ती पॅट्रिका गार्डनर यादेखील सजून-धजून आल्या होत्या. त्यांनी गळ्यात ख्रिसमस डेकोरेशनसाठी तयार केलेला खास नेकलेस घातला होता.
 
मायकलच्या शिक्षिका म्हणाल्या, "आम्ही या शालेय वर्षाची सुरुवातच केली ती मुळी एका कुटुंबासारखी. कुटुंब केवळ डीएनएने एकत्र बांधलेलं हवं, असं गरजेचं नाही. जिथे आधार आणि प्रेम असतं ते कुटुंबच असतं."
 
न्यायमूर्तींनी दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा करताच मायकल, त्याचे आई-वडील, शिक्षक, मित्र अशा उपस्थित सर्वांनीच एकच जल्लोष केला.
 
गुरुवारी केंट काउंटी कोर्टाचा वार्षिक दत्तक दिन होता. या दिवशी 37 मुलांचं "प्रेमाने आणि अधिकृतपणे नव्या कुटुंबात स्वागत करण्यात आलं", असं कोर्टाने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलं.
 
या सोहळ्यावेळी माननीय न्यायमूर्ती पॅट्रिका गार्डनर म्हणाल्या, "कधी कधी त्यांचा प्रवास खूप मोठा असतो. त्यांनी मुलं आणि त्यांच्या कुटुंबांसाठी चमत्कार आणि परिवर्तन घडवलं आहे आणि भक्कम सामाजिक पाठिंबा मिळवला आहे. मायकलच्या दत्तक सुनावणीत याचा प्रत्यय आलाच आहे."
 
"किंडरगार्टनचा त्याचा संपूर्ण वर्ग आणि शाळा इथे उपस्थित आहे, त्याला हे सांगायला की "आम्हाला तू आवडतोस", "आम्ही तुझ्यासोबत आहोत", "आणि आम्ही केवळ आज नाही तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक वर्षी आम्ही इथे असू"."
 
या विशेष दत्तक सुनावणीचं वार्तांकन करण्यासाठी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही जमले होते. त्यांच्याशी बोलताना मायकल म्हणाला, "I love my daddy". मायकल बोलत होता आणि त्याचे वडील आनंदाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे कौतुकाने बघत होते.
 
केंट काउंटी कोर्टाने आपल्या फेसबुकवर टाकलेला मायकलच्या दत्तक सुनावणीचा फोटो फेसबुकवर 1 लाखवेळा शेअर करण्यात आला आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

कोलकाता ते मुंबई जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी आढळली

LIVE: मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवली जाणार नाही

बल्गेरियामध्ये दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात १२ मृत्यू तर ५० जखमी

केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

पुढील लेख
Show comments