Marathi Biodata Maker

इंटरनेट वापरात मराठी भाषा पुढे

शुक्रवार, 13 जुलै 2018 (15:33 IST)
भारतात इंटरनेट वापरात सर्वाधिक मराठी, बंगाली आणि तेलुगू भाषकांचा दबदबा असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. रेवरी लँग्वेज टेक्नॉलॉजीने याबाबतचे सर्व्हेक्षण केले होते. त्यामध्ये मराठी युजर्स इंटरनेटवर सर्वाधिक अॅक्टीव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
द डीजिटल भारतीय भाषा अहवालानुसार (द्वितीय आवृत्ती) अंड्रॉईड युजर्सकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेसंदर्भात अॅनॅलिसीस करण्यात आले. त्यामध्ये रेव्हरीज आणि इंडिक की-बोर्ड स्वलेख फ्लीप हे अॅप डाऊनलोड केलेल्या 89,000 युजर्संचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक युजर्सकडून प्रमाण भाषेत सरासरी किती शब्द टाईप केले जातात हे तपासण्यात आले. त्यानुसार मराठी आणि बंगाली नागरिकांकडून डीजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच या युजर्संकडून अधिक प्रमाणात प्रादेशिक भाषेचा वापर करण्यात येतो. इंटरनेटवरील माहितीचाही सर्वाधिक उपयोग या युजर्संकडूनच केला जात आहे. याशिवाय प्रमुख भारतीय भाषांसोबतच, बोडो, डोगरी, मैथिली, सिंधी आणि संताली भाषेचाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दरम्यान, 99 टक्के भारतीय युजर्सं आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन वापरतात. तर जवळपास 54 टक्के युजर्स 5 ते 11 हजार रुपयांच्या किमतीचे सर्वसाधारण मोबाईल वापरतात. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नीटपुनर्परीक्षेसाठीचा कालावधी वाढवला, रफवर्कसाठी चार पानांची सवलत

LIVE: राज्य सरकारने ॲप-आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली

गृहिणींना ३०,००० रुपये मासिक उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पेट्रोल आणि डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता दिवसाला फक्त इतकेच लिटर तेल उपलब्ध होईल

ईव्ही स्कूटर कशी निवडावी? खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा

पुढील लेख
Show comments