अष्टगणेश : वक्रतुंड
वक्रतुंण्डावतारश्च देहांना ब्रम्हाधारक:।
मत्सरासुराहंता स सिंहवाहनग: स्मृत:।।
वरदान प्राप्त झाल्यानंतर मत्सरासुराने पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग लोकांवर आक्रमण केले. यामध्ये वरूण, कुबेर आणि यम देवांचा पराभव झाला आणि मत्सरासुर स्वर्गाधिपती झाला. मत्सरासुराच्या अत्याचाराला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आदी देव कैलासपती भगवान शंकराकडे गेले आणि मत्सरासुराच्या अत्याचाराचा वृतांत सांगितला तेव्हा शंकराने त्याचा बीमोड करण्याचे आश्वासन दिले.
WD |
अनिती आणि अत्याचाराचे आकांडतांडव निर्माण झाले होते. तेव्हा सर्व देव मत्सरासुराचा विनाश करण्याचा मार्ग शोधण्यासाठी एकत्र आले. कोणताही मार्ग सापडत नसल्याचे पाहून सर्वजण अत्यंत दु:खी झाले. त्यावेळी भगवान दत्तात्रय तेथे आले आणि त्यांनी देवांना वक्रतुंडाच्या एकाक्षरी मंत्राचा उपदेश करण्यासाठी प्रेरीत केले.
