रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (14:55 IST)

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन

देवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक मंगल कार्यात त्याला प्रथम स्थान मिळालेला आहे. गणपती जल तत्त्वाचे अधिपती आहे. हेच कारण आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चना करून  गणपती-प्रतिमेचे विसर्जन केले जाते.  
 
धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेदव्यासजींनी गणेश चतुर्थीपासून लागोपाठ दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. याला गणपतीने अक्षरशः: लिहिली होती. जेव्हा वेदव्‍यास कथा सुनावतं होते तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यांना हे माहीत पडले नाही की या कथेचे गणपतीवर काय प्रभाव पडत आहे.  
 
जेव्हा महर्षीने कथा पूर्ण करून डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की 10 दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचा तापमान फार वाढला होता. त्यांना ताप आला होता. महर्षी वेदव्‍यासजींनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी लावायला सांगितली ज्याने त्यांच्या शरीरातील तापमान थोडा कमी झाला. असे मानले जाते की गण‍पति गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात, ज्याला गणपती उत्सवाच्या दरम्यान स्थापित केले जाते.  
 
मान्‍यता अशी आहे की गणपती उत्सवाच्या दरम्यान लोक आपल्या सर्व इच्छा गणपतीच्या कानात सांगतात. गणेश स्थापने नंतर 10 दिवसांपर्यंत गणपती लोकांची इच्छा ऐकता ऐकता एवढे गरम होऊन जातात की चतुर्दशीला वाहत्या पाण्यात विसर्जित करून त्यांना शीतल करण्यात येते.  
 
गणपती बाप्पाशी निगडित मोऱ्या नावामागे गणपतीचे मयूरेश्वर स्वरूप मानले जाते. गणेश-पुराणानुसार सिंधू नावाच्या दानवाच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी देवगणांनी गणपतीचे आव्हान केले. सिंधूचा संहार करण्यासाठी गणपतीने मयुराला वाहन निवडले आणि सहा भुजांचा अवतार धारण केला. या अवताराची पूजा भक्त गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषासोबत करतात.