deepawali
✕

नाना पाटेकर - अमित शाहा यांची भेट

Updated: मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (10:26 IST)
 
दोन दिवसांपूर्वीच अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. कोल्हापूरकरांची, सांगलीकरांची दुःख अमित शाह यांच्या कानावर घालून लवकरात लवकर मदत पाठवण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली का? हे समजू शकलेले नाही. नाना पाटेकर यांच्या राजकीय एन्ट्रीची याआधीही बरीच चर्चा झाली होती.
 
मात्र, त्यांनी यास नकार देत राजकारणात प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, आज शहांच्या भेटीमुळे पुन्हा नाना पाटेकर चर्चेत आले आहेत. पाटेकर यांनी अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर त्यांनी ही भेट खासगी होती, राजकीय नव्हती असे सांगितले आहे. शहा यांना भेटण्याआधी पाटेकर यांनी अंतर्गत सुरक्षा विशेष अधिकारी यांची भेट घेतली.
 
सोशल मीडियावरही या भेटीसंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये संसदेच्या आवारातून नाना पाटेकर अमित शाह यांच्या कार्यालयाकडे जाताना दिसत आहेत. दिल्लीत नाना पाटेकर आले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली मात्र ती भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे अद्याप कळू शकलेलं नाही.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांना दुष्काळाचा फटका; सोयाबीन आणि कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान

मुंबईतील विरार येथे एका फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले

पुढील लेख
Show comments