Dharma Sangrah
✕

सारा तेंडुलकरने मराठीत सांगितली आजीची आठवण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Updated: शुक्रवार, 9 जानेवारी 2026 (16:47 IST)
ALSO READ: मुस्लिम समाजात अन्नात थुंकण्यामागील तर्क काय? खरंच अशी परंपरा आहे का?
या व्हायरल व्हिडिओमध्ये, एका कार्यक्रमात स्टेजवरून अस्खलित मराठी बोलत सारा म्हणाली की तिची आजी तिला लहानपणी सोन्याच्या छोट्या भेटवस्तू कशा देत असे आणि ती मोठी झाल्यावर तिच्यासाठी काहीतरी खरेदी करण्याचे तिचे स्वप्न कसे होते आणि आता तिचे स्वतःचे पैसे कसे झाले आहेत. 
 
तिची मराठी बोलण्याची शैली आणि तिने तिच्या आजीसोबत शेअर केलेल्या गोड आठवणींनी नेटिझन्स आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडिया वर हा व्हिडीओ लक्ष वेधत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Tendulkar Arjun Tendulkar (@tendulkarsfamily)

व्हायरल व्हिडीओ मध्ये ती म्हणाली, मी खूप लहान असताना माझी आजी मला सोन्याचं काही तरी देत असे. कधी कानातले तर कधी सोन्याची साखळी. माझे एक स्वप्न होते की, मी मोठी झाल्यावर आजीसाठी काहीतरी माझ्या पैशांनी घेईन. आता माझं हे स्वप्न पूर्ण झाले आहे. 
ALSO READ: काय चमत्कार! कपड्यांसोबत वॉशिंग मशीनमध्ये १० मिनिटे फिरल्यानंतरही मांजर वाचली
साराने गेल्यावर्षी ऑगस्टच्या महिन्यात नवीन व्यवसाय सुरु केला आहे. तिने मुंबईच्या अंधेरीमध्ये तिची अकँडमी सुरु केली आहे. तिने पिलाटेस अकॅडमीची फ्रेंचाइजी घेतली असून ती लोकांना फिटनेसचे धडे देते. ती अनेकदा जिम मधले तिच्या वर्काउटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. 
ALSO READ: १० मुलींनंतर मुलगा झाला... १९ वर्षांत ११ व्यांदा आई बनली
तिच्या या अकॅडमीचे उद्घाटन सचिन तेंडुलकरांनी गणेश पूजन करून नारळ फोडून केलं. या वेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब आणि साराच्या काही मैत्रिणी उपस्थित होत्या.
 
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments