Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे
आज लोकसभा निवडणूकच्या पाचव्या टप्प्यासाठी सून देशातील एकूण 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी सकाळी 7 वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यात ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, आणि धुळे अशा 13 जागांसाठी मतदान झाले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे येते आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक बूथला भेट देत आहे. त्यांना या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्या असून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहे. ते म्हणाले निवडणूक आयोगाचे योग्य नियोजन नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यांनी मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव असल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा दावा केला आहे.
त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करत म्हटले आहे, हा संदेश निवडणूक आयोगासाठी असून मुंबईकर मतदानासाठी सकाळपासून बाहेर पडले असून मुंबईतील मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव आहे. मतदान केंद्रावर पाण्याची सोय नाही, पंखे नाही, लोक उन्हात उभे आहे. खरंतर ही सर्व जबादारी निवडणूक आयोगाची असून त्यांनी काहीच सुविधा दिलेल्या नाही.
काही ठिकाणी लोक संभ्रमात आहे. फोन आत घेऊन जावा की नाही, घडल्याळ घालावे की नाही. या मुळे मतदानाची टक्केवारी घसरली आहे. निवडणूक आयोग साथ गतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही ठिकाणी हे जाणीवपूवर्क केले जात आहे. असे ते म्हणाले.
Edited by - Priya Dixit