Festival Posters
✕

महाराष्ट्रात भाजप अडचणीत, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

Updated: बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (17:23 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर धुडकावून लावल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबईत 2-3 कार्यक्रमांना हजेरी लावली, पण त्यांनी माध्यमांपासून अंतर राखले. यापूर्वी शिवसेनेचे नेते सातत्याने भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, असा सल्ला देत होते, पण भाजपने नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदे समर्थकांनी पलटी मारली. आता शिंदे समर्थक भाजप हायकमांडच्या निर्णयाशी सहमत असल्याचे वृत्त समोर येत आहे.
ALSO READ: भाजप जो काही निर्णय घेईल शिवसेना त्याला पाठिंबा देईल-एकनाथ शिंदे
मिळालेल्या माहितीनुसार तर एकनाथ शिंदे उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री बनवू शकतात. उदय सामंत हे कोकणातील रत्नागिरीचे आमदार आहे. शिंदे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी ते एक आहे. याशिवाय शिंदे आपला मुलगा श्रीकांत यांना उपमुख्यमंत्री बनवू शकतात. ते स्वत:च्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात आणि मुलाच्या रिक्त जागेवरून खासदार म्हणून निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होऊ शकतात. पण, हे सर्व आज स्पष्ट होणार आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हा बादशहा म्हणून उदयास आला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत तणाव वाढल्यानंतर ते प्रत्येक पाऊल सावधपणे उचलत आहे.  

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी नवीन विमानसेवा सुरू

नागपुरात भाड्याच्या खोलीत ३७ लाखांच्या बनावट नोटा जप्त; ५०० रुपयांच्या नोटांचा मोठा साठा उघड

जळगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेक, पोलिसांनी लाठीचार्ज केला

पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी नवीन विमानसेवा सुरू, इंडिगो सेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार

नाशिकमध्ये भीषण अपघात,मिनी ट्रक आणि पिकअपच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments