बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (12:22 IST)

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

sanjay raut
Sanjay Raut news : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाला महाविकास आघाडीने कडाडून विरोध केला असून तो चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तर आता शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनीही हा निर्णय मान्य करण्यास नकार दिला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत म्हणतात की, या देशात ईव्हीएम हे फ्रॉड आहे. यावर विरोधक 10 वर्षांपासून प्रश्न उपस्थित करत आहे. तसेच ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना भाजपनेही यावर प्रश्न उपस्थित केले होते, ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातही पाहायला मिळेल.
 
तसलेच शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत म्हणाले की, “गेल्या 10 वर्षांपासून आम्ही हा प्रश्न उपस्थित करत आहोत. काँग्रेस सत्तेत असताना भाजपने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. ईव्हीएम ही या देशात फसवणूक आहे आणि ईव्हीएम नसतील तर भाजपला संपूर्ण देशात 25 जागाही मिळणार नाहीत. महाराष्ट्र आणि हरियाणाचे निकाल ज्या प्रकारे आले आहेत ते आम्हाला मान्य नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जे काही निकाल येतील ते आम्ही स्वीकारू असे संजय राऊत म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik