Marathi Biodata Maker
✕

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

Updated: सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (16:54 IST)
 
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला आता एक आठवडा बाकी आहे.राजकीय पक्षांमधील एकमेकांवरील हल्लेही तीव्र झाले आहे

अलीकडेच एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडी पक्ष काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करण्याचे आव्हान दिले होते. आता शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
 
उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर म्हणाले की, पंतप्रधान मोदी आज नांदेडमध्ये होते. मी पण तिथून येत आहे. सुदैवाने मला ते भेटायला मिळाले नाही, हे माझे नशीब. मला त्यांनी आव्हान दिले आहे. की, बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी राहुल गांधींनी दोन चांगले शब्द बोलावे,या वर ते म्हणाले, जेव्हा शिवाजी पार्कवर एमव्हीएची सभा होती, तेव्हा राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले होते.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदीजी, तुमच्या टीमने हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला नसेल, तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवतो. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत उद्धव म्हणाले की, राहुल गांधींनी बाळासाहेबांना त्यांच्या स्मारकावर अभिवादन केले. राहुल गांधींनी मला कधीच खोटे मुलगा  म्हटले नाही, मात्र तुम्ही ते पाप केले आहे.

महाराष्ट्रात जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, बाळासाहेबांची स्तुती करण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. मी आघाडीतील काँग्रेसच्या सहकाऱ्यांना आव्हान देतो की, त्यांनी काँग्रेस नेत्यांची, बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांच्या विचारसरणीची राहुल गाँधी कडून जाहिर स्तुति करावी.
 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आधी बंद दाराआड गुप्त बैठक! मग दोन्ही ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर दिसले

दिवाळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि पुणे मार्गावर विशेष गाड्या धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments