बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (08:36 IST)

पुन्हा बंडखोर उमेदवारांवर महाराष्ट्रात काँग्रेसची कारवाई सुरू, या उमेदवारांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढले

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर कारवाई करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी 7 बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी केली आहे. या उमेदवारांना आता पुढील सहा वर्षे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवता येणार नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होत आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहे. तर निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी 7 बंडखोर उमेदवारांना काढून टाकले आहे. या उमेदवारांना आता पुढील सहा वर्षे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवता येणार नाही.  
 
काँग्रेसने पक्षातून काढून टाकलेल्या उमेदवारांमध्ये शिंदखेडामधून बंडखोर शामकांत सनेर, पर्वतीतून आबा बागुल, शिवाजीनगरमधून मनीष आनंद, परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया, श्रीवर्धनमधून राजेंद्र ठाकूर, कल्याण बोराडे, चंद्रपाल चौकसे यांचा सहभाग आहे. हे उमेदवार बंडखोर घोषित झालेल्या 6 मतदारसंघातील आहे.