रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: रविवार, 10 नोव्हेंबर 2024 (16:19 IST)

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

ajit pawar
उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी एका सभेत ‘बटेंगे  तो कटेंगे’चा नारा दिला होता. त्याला शुक्रवारी अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. असे काही इथे चालणार नाही. महाराष्ट्रातील जनता असे नारे स्वीकारत नाही, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांना चोख उत्तर दिले.ते म्हणाले, हे यूपी मध्ये चालत असेल महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. सबका साथ सबका विकास यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. 
 
20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने सत्तेत आल्यास जातीय जनगणना करून आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे नेण्याचे आश्वासन दिले आहे.  पीएम मोदींनी 'आपण एकजूट राहिलो तर सुरक्षित राहू'चा नारा दिला आहे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे  तो कटेंगेचा नारा दिला आहे. 
 
 योगी आदित्यनाथ यांच्या घोषणाबाजीवर महायुतीचे सहकारी अजित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. महाराष्ट्र ही शिवाजी, आंबेडकर आणि शाहूजी महाराजांचीभूमि आहे. बाहेरून कही जण येतात आणि अस कही बोलतात. इत्र राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे ते ठरवून घ्यावे. अस म्हणत प्रत्युत्तर दिले. 
Edited By - Priya Dixit