Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूरमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2025 (16:16 IST)
कोल्हापूर पर्यटन

पन्हाळा किल्ला-
कोल्हापूर शहरातील पन्हाळा किल्ला हे कोल्हापूरचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे कोल्हापूरपासून 20 किमी अंतरावर आहे. या किल्ल्याचे भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांमध्ये स्थान आहे. तसेच 12 व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा भोज यांनी बांधलेल्या पन्हाळा किल्ला दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतो.   

महालक्ष्मी मंदिर-
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिर हे देवी लक्ष्मीला समर्पित असून हे कोल्हापूर मधील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. महालक्ष्मीला देवी अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते, जी स्थानिक लोकांसाठी तसेच विविध भागातून येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. महालक्ष्मी मंदिर हे चालुक्य शासकांनी 7 व्या शतकात बांधले होते.

दाजीपूर वन्यजीव अभयारण्य-
दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे निसर्ग प्रेमींसाठी कोल्हापूरमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या अभयारण्यात  बायसन, बिबट्या, वाघ, अस्वल, हरण यासारख्या विविध वन्यजीव प्रजाती पाहता येतात. दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे कोल्हापूरच्या महाराजांचे शिकार करण्याचे ठिकाण होते जे 1985 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते.   

श्री छत्रपती शाहू संग्रहालय-
कोल्हापूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा प्रवास सुरू करण्यासाठी श्री छत्रपती शाहू संग्रहालय हे एक चांगले ठिकाण आहे. हा राजवाडा 1877-84 मध्ये बांधण्यात आला होता आणि तो छत्रपती शाहू महाराजांचे निवासस्थान आहे. राजवाड्याच्या तळमजल्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. याच प्रमाणे कोल्हापूर मध्ये  गगनबावडा, रामतीर्थ धबधबा, कोपेश्वर मंदिर, सागरेश्वर हरण अभयारण्य, रंकाळा तलाव, ज्योतिबा मंदिर इत्यादी पर्यटन स्थळांना दरवर्षी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल होतात.

कोल्हापूर जावे कसे?
कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशन आहे जे मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज-कोल्हापूर विभागात आहे. कोल्हापूर रेल्वेमार्ग हा मुंबई, नागपूर, पुणे, तिरुपती यासारख्या शहरांना जोडलेला आहे. रेल्वे स्टेशनवर वरून येथून स्थानिक वाहनांच्या मदतीने पर्यटनस्थळी जाऊ शकता. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शेजारील शहरांशी चांगले जोडलेले आहे. कोल्हापूर हे मुंबई आणि बंगळुरूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4 वर वसलेले आहे. तसेच कोल्हापूरला जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या सरकारी बसेस देखील आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी खाजगी बसेस देखील आहे.<>

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

पवित्र संगमेश्वर मंदिर, जिथे दोन नद्यांच्या संगमावर इतिहास आणि भक्तीचा एक अनोखा प्रवाह दिसतो

गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

पुढील लेख
Show comments