Dharma Sangrah
✕

अध्यात्माने भारलेला निसर्गरम्य, मार्कंडेय ऋषींच्या तपश्चर्येचे पवित्र स्थान मार्कंडेय पर्वत नाशिक

Updated: बुधवार, 17 जून 2026 (18:12 IST)
ALSO READ: श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान
नाशिक हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक स्थळ असून जिल्ह्यातील वणी आणि कळवण परिसराच्या सीमेवर असलेला मार्कंडेय पर्वत हा धार्मिक, ऐतिहासिक आणि ट्रेकिंगच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे ४,३८४ फूट उंचीवर असलेला हा डोंगर निसर्गरम्य आणि अध्यात्माने भारलेला आहे.
 
धार्मिक व पौराणिक महत्त्व
पौराणिक कथेनुसार, या पर्वताचा संबंध मार्कंडेय ऋषींशी जोडला जातो. या पवित्र भूमीवर त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती, असे मानले जाते. या पर्वताला 'मार्कंडेय' हे नाव ज्यांच्यामुळे मिळाले, ते ऋषी मार्कंडेय यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. भगवान शिवाने त्यांना यमाच्या पाशातून सोडवून अमरत्वाचा वर दिला, त्या कथेचा संदर्भ या स्थानाशी जोडला जातो. गडावर मार्कंडेय ऋषींची गुहा आणि मूर्ती आजही पाहायला मिळते. 
 
तसेच पुराणांनुसार विशेषतः शिव महापुराण, मार्कंडेय ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली. ते चिरंजीवी अमर मानले जातात. पर्वताच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे मंदिर आहे, जे भारतातील एकमेव असे मंदिर मानले जाते. शिवलिंग आणि नंदी महाराजांचे दर्शनही घेता येते.
 
ऐतिहासिक महत्त्व आणि रचना
हा केवळ एक धार्मिक पर्वत नसून शिवकाळातील एक महत्त्वाचा डोंगराळ किल्ला (गड) आहे. सप्तशृंगी गडाच्या संरक्षणासाठी आणि सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे.गडावर अनेक पाण्याची टाकी (रॉक-कट टाके), जुने अवशेष आणि गुहा आहे.
 
ट्रेकर्ससाठी आकर्षण
समोरच दिसणारा प्रसिद्ध सप्तशृंगी गड आणि मार्कंडेय पर्वत हे एकमेकांसमोर उभे आहे. मार्कंडेय गडावरून सप्तशृंगी देवीच्या सुळक्याचे अत्यंत विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात हा संपूर्ण डोंगर हिरवागार होतो आणि धुक्याच्या चादरीत हरवून जातो. गडाची चढण मध्यम स्वरूपाची असून शेवटच्या टप्प्यात काही उभ्या पायऱ्या आहे. 
ALSO READ: सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो
आकर्षणे: खडकात कोरलेल्या पायऱ्या, गुहा आणि नैसर्गिक सौंदर्य, किल्ल्यावरील अवशेष, गुहा, नंदी मूर्ती, सप्तशृंगी गड, रावळ्या-जावळ्या गड यांचे विहंगम दृश्य. सोमवती अमावस्येला विशेष यात्रा भरते. 
 
मार्कंडेय पर्वत नाशिक जावे कसे? 
नाशिक शहरापासून साधारण ५5 ते ६० किमी. नाशिकवरून दिंडोरी-वणी मार्गे जाता येते. वणी जवळील 'मुलणे' हे या गडाच्या पायथ्याचे गाव आहे. मुलणे गावातून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे.
ALSO READ: हिरवीगार जंगले, उंच पर्वत आणि शुद्ध हवा; जिथे भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम पंच केदार मध्यमहेश्वर
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांना चार वर्षे जुन्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

नाना पाटेकर माधुरी दीक्षितच्या शोमध्ये येणार होते, पण आता सोनाली बेंद्रे पहिली पाहुणी असेल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ९ मंदिरे; नवरात्रीत एकदा तरी दर्शन घ्यावे अशी श्रद्धा

माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकत्र; ‘कोण होणार करोडपती’च्या शुभारंभात उलगडणार खास किस्से

पुढील लेख
Show comments