शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : मंगळवार, 11 जून 2024 (08:40 IST)

Joy of Flowers on Kas Plateau कास पठारवर पर्यटकांनी लुटला लुटला फुलांचा आनंद

kas pathar
joy of flowers on Kas Plateau कास पुष्प पठारवरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा हंगाम ऐन बहरात आला असुन विविधरंगी फुलांनी पठार बहरून गेले आहे हा रंग सोहळा पाहण्यासाठी गेल्या चार दिवसापासुन पर्यटकांनी तोबा गर्दी केली असुन आज पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले मात्र एकाच दिवशी एवढी गर्दी झाल्याने वन समितीचे व्यवस्थापन दुपारपासुन कोलमडल्याचे दिसत होते वाहनतळ हाऊसफुल होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग झाल्याने व मधोमध काही वाहने बंद पडल्याने बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती अखेर काही पर्यटकांनी पठार न पाहता परतीचा प्रवास घेतल्याचे दिसुन आले.
 
सलग पाच दिवस सुट्टी असल्याने पर्यटकांनी कास पुष्प पठारवरील फुलांचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी धाव घेतली असुन गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे सकाळी दहा वाजताच घाटाई मार्ग व कास तलाव कडील वाहनतळ हाऊसफुल झाली होती त्यांनंतर पर्यटकांचा लोंढा दिवसभर कायम राहील्याने घाटाई फाट्यावर वाहतुक कोंडी होऊ लागली अखेर वाहनतळ हाऊस फुल झाल्याने पठार पासून हेरिटेजवाडी हॉटेल पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांनी वाहन पार्किंग केली अनं पायी प्रवास करत पठार गाठले पठारावरील गुलाबी थंडी सकाळपासुन सतत पडणार्या पावसाच्या रिपरीपीत भिजन्यासोबतच गेंद ,तेरडा . सोनकी . टोपली कारवी , चवर , नाल , कापरू निलिमा आदी फुलांना मोठ्या प्रमाणात बहर असुन या फुलांचा रंगसोहळा पाहुन पर्यटक आनंदुन गेले कुमुदिनी तळ्यासोबतच कास तलाव वर पर्यटकांनी गर्दी केली होती.