Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमी दिवसांत भरपूर नफा मिळवून देणारे नगदी पीक - फुलकोबी लागवड!

Updated: शनिवार, 4 जुलै 2026 (15:23 IST)
१. हवामान आणि जमीन    
हवामान: फुलकोबी हे प्रामुख्याने थंड आणि दमट हवामानात येणारे पीक आहे. गड्डा तयार होताना तापमान १५∘C ते २०∘C च्या दरम्यान असणे उत्तम मानले जाते. जास्त तापमानामुळे गड्यांचा दर्जा बिघडतो.  
जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली जमीन (सामू/pH ६ ते ७) या पिकासाठी योग्य ठरते.

२. लागवडीचा हंगाम आणि सुधारित जाती
महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन हंगामात कोबीची लागवड केली जाते
पावसाळी (लवकर येणाऱ्या)-जून - जुलै:पूसा कतकी, अर्ली कुंवारी, पुसा दिपाली, सिंजेंटा ६०९९
हिवाळी (मध्यम)    ऑगस्ट - सप्टेंबर: पुसा शुब्रा, पुसा सिंथेटिक, पंत शुब्रा
उन्हाळी (उशिरा येणाऱ्या)ऑक्टोबर - नोव्हेंबर: पुसा स्नोबॉल, स्नोबॉल १६

३. रोपवाटिका व्यवस्थापन  
फुलकोबीची थेट शेतात लागवड न करता आधी रोपे तयार केली जातात.
१ हेक्टर लागवडीसाठी सुमारे ३७५ ते ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.गादीवाफ्यावर बियाणे पेरून गादीवाफे प्लास्टिक किंवा गवताने झाकावेत. ५ ते ६ दिवसांत कोंब आल्यावर आच्छादन काढून टाकावे.रोपे साधारण ३ ते ४ आठवड्यांची (४ ते ५ पानांवर) झाली की ती मुख्य शेतात लावण्यासाठी तयार होतात.   

४. मुख्य शेताची तयारी आणि लागवड  
शेत चांगले नांगरून, कुळवून भुसभुशीत करावे आणि हेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
लागवडीचे अंतर: * लवकर येणाऱ्या जातींसाठी: ४५ सेमी × ४५ सेमी किंवा ४५ सेमी × ३० सेमी.उशिरा येणाऱ्या जातींसाठी: ६० सेमी × ४५ सेमी.  
रोपांची लागवड नेहमी संध्याकाळच्या वेळी करावी आणि लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे.  

५. खत आणि पाणी व्यवस्थापन  
खत व्यवस्थापन: नत्र, स्फुरद आणि पालाश (१५०:७५:७५ किलो प्रति हेक्टर) द्यावे. नत्राचा अर्धा डोस आणि स्फुरद-पालाश पूर्ण डोस लागवडीच्या वेळी द्यावा. उर्वरित नत्र लागवडीनंतर १ महिन्याने द्यावे.  
बोरॉनचा वापर: कोबीचे गड्डे पांढरेशुभ्र राहण्यासाठी आणि कडक होण्यासाठी प्रति एकरी ५ किलो बोराॅक्स (Borax) खत देणे अत्यंत आवश्यक आहे. बोरॉनच्या कमतरतेमुळे गड्यांवर तांबडे डाग पडतात.  
पाणी: पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. गड्डा तयार होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.  

६. काढणी आणि उत्पादन
जातीनुसार लागवडीनंतर ६० ते ९० दिवसांत गड्डे काढणीस तयार होतात.गड्डा घट्ट आणि पांढरा असतानाच, पानाच्या आवरणासह (दोन पानांसह) देठ कापून काढणी करावी.
उत्पादन: सरासरी हेक्टरी २०० ते २५० क्विंटल उत्पादन मिळते.
 ALSO READ: अत्यंत फायदेशीर आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय; मिरची लागवड<> विशेष टीप : गड्डा पांढराशुभ्र ठेवण्यासाठी काढणीच्या १ आठवडा आधी कोबीची सभोवतालची पाने गड्यावर गोळा करून सुतळीने हलकी बांधावीत, जेणेकरून थेट सूर्यप्रकाश गड्यावर पडणार नाही आणि गड्याचा रंग पिवळा पडणार नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतीचा वापर; पत्ताकोबी लागवडीची संपूर्ण माहिती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: ३ ते ४ वर्षे सातत्याने उत्पादन शेती; तोंडली लागवडीची संपूर्ण माहिती
About Author
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments