रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (22:01 IST)

जालना :माझे उपोषण सुरूच राहणार, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अशातच मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची  बैठक झाली होती. 
 
दरम्यान, जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाच्या जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती नसल्याने माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं प्रयत्न अपयशी ठरला असून, जरांगे यांचे उपोषण सुरूच राहणार आहे.
 
तर, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor