Daily Horoscope
✕

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अतिशय निराशजनक : अशोक चव्हाण

Updated: बुधवार, 5 मे 2021 (16:19 IST)
 
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कोणतीही चर्चा न करता कायदा केला. केंद्राने १०२ वी घटनादुरुस्ती १४ ऑगस्ट २०१८ ला केली. तर १५ नोव्हेंबर २०१८ ला गायकवाड समितीचा अहवाल आला आणि ३० नोव्हेंबरला मराठा आरक्षणाचा कायदा केला. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षण देता येत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा करुन मराठा समाजाची फसवणूक केली, असं अशोक चव्हाण म्हणाले.
 
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य सरकारची भूमिका मांडत आहे. आजचा निकाल निराशाजनक आहे. मराठा समाजसाठी, महाराष्ट्रावर अन्याय करणारा निकाल आहे. राज्यात हा विषय असताना संपूर्ण संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कॅबिनेटनं कायदा मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. फडणवीस सरकारनं जे वकील लावले होते. तेच वकील महाविकासआघाडी सरकारनं वकील लावले होते.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जितक्या बैठका घेतल्या नसतील तितक्या बैठका घेतल्या गेल्या. सर्वाच्या सहकार्यानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली त्यात समन्वयाचा अभाव कधीही नव्हता, असं अशोक चव्हाण म्हणाले. इंद्रा सहानीचा केसचा लॉ सर्वोच्च न्यायालयानं आणि केंद्र सरकारनं ग्राह्य धरला आहे. गायकवाड समितीचा अहवाल, देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेला कायदा अस्वीकृत केला, असं अशोक चव्हाण म्हणाले.
 
केंद्र सरकारच्या अ‌ॅटर्नी जनरल यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार नाहीत, असं म्हटलं. त्यांनी पुन्हा राज्यांना अधिकार आहेत, असं म्हणाले. १०२ वी घटनादुरुस्ती १४ ऑगस्ट २०१८ ला झाली. १५ नोव्हेंबर २०१८ ला गायकवाड समितीचा अहवाल आला. ३० नोव्हेंबरला कायदा केला. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं निक्षून सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता. त्यानंतर आता फसवणूक केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला, असं अशोक चव्हाण म्हणाले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments