Daily Horoscope
✕

तर मराठा समाज पुन्हा पूर्ण ताकदीने रस्त्यांवर उतरेल

Updated: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:38 IST)
 
मुंबईत ‘मराठा जोडो’ अभियानाची सुरुवात लालबाग येथून करण्यात आली. या अभियानाच्या निमित्ताने मुबई ते ठाणे अशी यात्रा काढण्यात आली. लालबाग येथील भारतमाता चौकातून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात्रेत शेकडो मराठा तरुण मोटारसायकल आणि अन्य वाहने घेऊन सहभागी झाले होते.
 
यावेळी घोषणांनी लालबाग परिसर दुमदुमला होता. कुर्ला येथील सर्वेश्‍वर मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमात मराठा बांधवांना आरक्षणासंदर्भात माहिती देण्यात आली. दुपारी बारा वाजता चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे यात्रेचे आगमन झाले. तेथे जोरदार स्वागत करण्यात आले.
 
यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्‍त करण्यात आली. पंढरपूर येथून मंत्रालय येथे पायी दिंडी यात्रा निघणार आहे. त्याचे मुंबईमध्ये स्वागत करण्यात येईल आणि त्यात सर्वजण सहभागी होतील, असे समन्वयकांच्या वतीने सांगण्यात आले. ठाण्यात यात्रेचा समारोप करण्यात आला. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या वादावरून राजकारण तापले; मनसे आणि शिवसेनेच्या विरोधानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहा! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द

महाराष्ट्र गारठला! निफाडमध्ये पारा ६.५ अंशांवर, तर पुण्यात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; पाहा तुमच्या शहराचा अंदाज

LIVE: ई-बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर रोजी ऑटो रिक्षा चालक राज्यव्यापी संप करणार

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर रोजी ऑटो रिक्षा चालक राज्यव्यापी संप करणार

पुढील लेख
Show comments