शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (08:45 IST)

खुशखबर, पुण्यात गिर्यारोहणाला परवानगी

पुण्यात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी मिळाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहेत.याबाबत महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन सादर केले होते. 
 
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्हयातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग साठी जाताना एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणा-या प्रत्येक नागरिकाचे  थर्मल स्क्रिनिंग करणेत यावे, अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील, सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहिर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळणेत यावा, दहा वर्षांचे आतील तसेच पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देऊ नये, ताप, सर्दी खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना सहभाग देऊ नये, स्थानिकांच्या घरात भोजन, मुक्काम इ.करु नये, एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत आदि सूचना देण्यात आल्या असून या सूचनांचे उल्‍लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे.