1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (11:05 IST)

श्री हनुमानाची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी।।
कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी।।1।।
 
जय देव जय देव जय श्रीहनुमंता।
तुमचेनी प्रसादे न भी कृतांता।।धृ।।
 
दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द।
थरथरला धरणीधर मानीला खेद।
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद
रामी रामदासा शक्तीचा शोध।।जय।।2।।