Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2016

Updated: शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (16:46 IST)
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण होत आहे. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.  
 
सिंह : जूनी येणी वसूल होतील. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणारे, इमारत बांधकाम व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी येतील.  
 
कन्या : परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या.  
तूळ : आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त प्रवास घडून येतील. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील.  
 
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल.  
 
धनु : नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.
मकर : बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.  
 
कुंभ : कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. लेखकांच्या हातून टिकात्मक लिखाण होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश मिळेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपले अंदाड अचूक ठरतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. संतानं संबंधित काळजी राहण्याची शक्यता आहे. 
 
मीन : प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. जवळचे प्रवास टाळावे. भावाबहिणींसंबंधात ताण तणाव वाढतील. मन सुन्न करणार्‍या घटना घडतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. महत्वाचे कागदोपत्रीचे व्यवहार मनोजोगे होतील. मनस्वास्थ लाभेल.  मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Janmashtami Essay 2026 जन्माष्टमी निबंध

Kajari Teej 2026: कजरी तीज शुभ वेळ, विधी आणि या दिवशी काय करावे हे जाणून घ्या

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments