Marathi Biodata Maker
✕

साप्ताहिक राशीफल 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2016

Updated: शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (17:10 IST)
 
कर्क : या आठवड्यात तुम्ही मौज मस्ती आणि मनोरंजक प्रारुपांमध्ये अधिक लक्ष्य द्याल. पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील.  
 
सिंह : या वेळेस तुमच्यात जोश आणि उत्साह राहणार आहे. नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल.   
 
कन्या : या आठवड्यात तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे चढ उतार येण्याची शक्यता आहे. सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. 
 
तूळ : या आठवड्यात व्यवसायी जातकांना कायदे व सरकारी प्रकरणांमुळे त्रास होईल. काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल.  
 
वृश्चिक : वृश्चिक जातक आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक बाबींपेक्षा कौटुंबिक प्रकरणांवर अधिक लक्ष्य देतील. एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड असेल. सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल.  
 
धनू : व्यावसायिकरीत्या तुम्हाला कठिन परिस्थितित पुढे जाणे भाग पडणार आहे. या वेळेस सरकारी अडचणींमुळे कार्य विलंबाने पूर्ण होतील. तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत असे पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल.  
 
मकर : आठवडाचा पहिला दिवस आर्थिक बाबींसाठी अनुकूल आहे.  तसं तर या वेळेस तुम्ही मोठ्या फायद्याची उमेद लावू नका कारण तुम्हाला भाग्याचा साथ मिळणार नाही.  तुमच्या प्रगतीला पूरक असे वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल.  
 
कुंभ : या आठवड्यात आठव्या स्थानात राहू आणि सूर्यासोबत बुध वक्री आहे. यह ग्रहीय स्थिति आपके अनुकूल नहीं है।गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल.   
 
मीन : प्रेम संबंधांसाठी आठवडा फारच अनुकूल आहे कारण पाचव्या स्थानावर प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आहे. तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. 

सर्व पहा

Happy Bhai Dooj 2026 Images भाऊबीज शुभेच्छा फोटो

Dhanteras 2026 शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, पूजा मुहूर्त आणि सोने-चांदी खरेदी करण्याचे महत्त्व जाणून घ्या

Happy Dhanteras Wishes 2026 images धनतेरस शुभेच्छा इमेजेस

धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात? जाणून घ्या योग्य दिशा आणि वेळ

धनत्रयोदशी २०२६: धनतेरसला सोनं खरेदी करणं शक्य नाही? मग घरी आणा या ५ स्वस्त वस्तू, मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments