suvichar
✕

नवीन आठवडा आणि तुमचे भविष्य

Updated: शनिवार, 26 मार्च 2016 (18:59 IST)
कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. भावंडांशी सुसंवाद साधाल आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.  

सिंह : व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. नव्या जोमाने कामाला लागाल. उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरणार आहेत. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल.  

कन्या : सरकारी कामात प्रगती करणारा आहे. सरकारी परवाने येतील. व्यवसाय उद्योगात आशावादी धोरण स्वीकारा. कोर्टातील कामात प्रगती होईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. जबाबदारीची कामे स्वीकारावी लागतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. बढती बदलीचे योग येतील.  

तूळ : आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.  

वृश्चिक : व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. 

धनू : प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन व्यावसायिक करार घडतील.  

मकर : ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल.  

कुंभ : पूर्वी झालेली दिशाभूल निस्तरण्यात वेळ जाईल. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील.व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.  

मीन : कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. मित्र परिवाराची भेट होईल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

वराह जयंती २०२६: भगवान वराहाची पूजा करणे महत्त्वाचे का आहे? हा अवतार कोणी घेतला? कथा जाणून घ्या

गणेशोत्सवासाठी खास नैवेद्य: जिभेवर विरघळणारा केळी बेसन हलवा; Banana Besan Halwa

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

नवसाला पावणारे भारतातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध गणेश मंदिरे Famous Ganesh Temples in India

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

Show comments