Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशी भविष्यफल

Published: सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (00:03 IST)
कर् पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवेफुगवे सहन करावे लागतील. त्याकरता मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी चांगल्या ग्रहमानाचा फायदा घ्यावा.

सिं नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.

कन्य सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. कारखानदारांनी कामगारांशी मर्यादेपेक्षा जास्त मवाळपणाने वागू नये. नोकरीत युक्तीने कामात चालढकल कराल. घरामध्ये तात्त्विक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी मूड बाजूला ठेवावेत.

तूळ काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत.

वृश्चि एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड असेल. सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. घरामध्ये प्रत्येकजण आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी शंकांचे वेळीच निरसन करावे.

धन तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत असे पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्याच कामात तुमची धाडसी प्रवृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळावा.

मक तुमच्या प्रगतीला पूरक असे वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये.

कुं गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे.

मी तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये कामाच्या रचनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ताण वाढेल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

Show comments