Daily Horoscope

साप्ताहिक राशीफल 8 ते 14 सप्टेंबर 2019

Updated: शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (16:11 IST)
 
कर्क : कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. प्रतिस्पर्धांची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नांवलौकिक मिळेल. त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा.
 
सिंह : या आठवड्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. इच्छापूर्ती होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कवि, कलाकार, गायक, लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.
 
कन्या : या आठवड्यात पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल.
 
तूळ : स्थावरात गुंतवणूक म्हणून खर्च कराल. जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. आठवड्याच्या पहिल्या टप्पा जवळचे प्रवास सुखाचे करणारा आहे. भावाबहिणींशी संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
 
वृश्चिक : या आठवड्यात बौद्धीक व कला क्षेत्रात चांगली संधी लाभेल. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठय़ा यशासाठी प्रयत्न करावे लागतील. मार्गदर्शन घडेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. अडचणी कमी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे.
 
धनू : या आठवड्यात वरीष्ठांच्या सल्ल्यानेच कामे मार्गी लावा. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाचे चांगले नियोजन कराल. धावपळीचे, कष्टाचे सार्थक होईल.
 
मकर : प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आपण आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. मनस्वास्थ लाभेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. अधिकारावर असणार्‍या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावरता येईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.
 
कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. व्यावसायिक कामात यश मिळे. नोकरीत वरीष्ठांचा पाठिंबा मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश संपादन कराल. आपले पूर्वनियोजित कार्यक्रम विनासायास मार्गी लागतील. या आठवड्यात कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक यांना चांगल्या संधी चालून येतील.
 
मीन : या आठवड्यात लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. संतांचा सहवास लाभेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. धाडसी निर्णय घेतले जातील.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख