Daily Horoscope
✕

ऑक्टोबर 2020 महिन्यातील राशीफल

Updated: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (17:23 IST)
 
कर्क : महिना साधारण आहे. स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा. 
 
सिंह : जुनी थांबलेली कामे मार्गी लागतील. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळेल. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होईल. विरोधक शांत राहतील. जोडीदार प्रसन्न आणि अपत्य संतुष्ट राहतील. एकुणच तुमच्यासाठी हा चांगला महिना आहे. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. 
 
कन्या : या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा. 
 
तूळ : तुमच्या जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. 
 
वृश्चिक : तुम्ही चिंतित राहाल. शत्रू पक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. 
 
धनु : सर्व काही ठीक चालले आहे. लहानमोठया समस्या सोडल्या तर हा महिना उत्तम चालला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल.  
 
मकर : काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल. कुटुंबीय एका मजबूत भिंतीसारखे तुमच्यासोबत ठामपणे उभे राहतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. 
 
कुंभ : हा महिना कडू-गोड अनुभवांचा असेल. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर तर असतील पण यासाठी अधिक पैसेही खर्चावे लागतील. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल. 
 
मीन : या महिन्यात सावध राहणे फारच गरजेचे आहे, कोणीतरी आपल्याविरुध्द कट रचत आहे. हलकीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. एका मांगलिक कार्याचा योग जुळत आहे. सकारात्मक वातावरण कायम राहील. फार मेहनत करावी लागेल. हो, त्यानुसार फळही मिळेल. इच्छीत लाभाने आनंद होईल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती शक्य आहे. तब्येतही थोडी नाजुक राहील. विद्यार्थी वर्गासाठी चांगली बातमी आहे.

सर्व पहा

Shradh Paksha 2026: श्राद्ध पक्षातील चतुर्दशी तिथीचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते?

नवरात्रीच्या उपवासासाठी राजगिरा लाडू घरीच कसे बनवायचे? पाक न करता सोपी पद्धत

विंध्यचलच्या विंध्यवासिनी देवीचे दर्शन का मानले जाते महत्त्वाचे? मंदिराची कथा आणि यात्रा

Sarv Pitru Amavasya 2026 सर्व पितृ अमावस्येला महादेवाला या ५ वस्तू अर्पित करा

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments