Daily Horoscope
✕

Beetroot Hair Mask: केसांच्या समस्येसाठी बीटरुटचे हेअर मास्क वापरा

Updated: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (15:02 IST)

बीटरूटचे पाणी टाळूची खाज दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र यासाठी बीटरूटचे पाणी योग्य प्रकारे वापरणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ या. 
 
बीटरूट पाणी-
बीटरूटच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यासोबतच बीटरूटच्या पाण्यात आयरन, पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स आढळतात. हे स्कॅल्प खोलवर साफ करण्यासोबतच केस मजबूत करण्याचं काम करते. याच्या वापराने केस चमकदार होतात. आठवड्यातून दोनदा बीटरूटचे पाणी वापरल्यास केस नैसर्गिकरित्या मजबूत होतात.
 
कसे वापरायचे -
सर्व प्रथम, दोन बीटरूट्स पासून रस तयार करा. आता त्यात 1 चमचे आले, 1 चमचे ऑलिव्ह ऑईल घाला. ही पेस्ट तयार करा आणि टाळूवर मसाज करा. त्यानंतर साधारण 15 मिनिटांनी डोके धुवा. 
 
केसांचा मास्क -
बीटरूट हे हेअर मास्कमध्ये मिसळूनही लावू शकता. यासाठी 2 चमचे बीटरूटचा रस, 2 चमचे दही आणि 2 चमचे कॉफी पावडर मिक्स करा. या सर्व गोष्टींची पेस्ट बनवून केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत लावा. सुमारे 30 मिनिटे ठेवल्यानंतर ते स्वच्छ धुवा.
 
केसांचा स्प्रे -
बीटरूटचा हेअर स्प्रे बनवण्यासाठी 3 बीटरूट उकळा. नंतर त्याचे पाणी थंड करून स्प्रे बाटलीत साठवा. आता या पाण्याने तुमच्या टाळूची मालिश करा. 20 मिनिटे ठेवल्यानंतर केस शॅम्पूने धुवा.
 




Edited by - Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस दाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

रात्री झोपताना सतत विचार येतात? अतिविचार थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय!

मनावरील ताण आणि चिंता दूर करायची आहे? मन शांत ठेवण्यासाठी दररोज करा ही प्रभावी योगासने; योग्य पद्धत जाणून घ्या!

पंचतंत्र : उद्दत नावाच्या एका गाढवाची गोष्ट

दिवाळीचा फराळ आधीच बनवून ठेवायचा आहे? कोणता पदार्थ किती दिवस टिकतो ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments