Dharma Sangrah
✕

Beauty Benefits of Buttermilk : ब्युटी रूटीनमध्ये ताकाचा समावेश करा; त्वचा आणि केसांसाठी जाणून घ्या फायदे

Updated: गुरूवार, 3 सप्टेंबर 2026 (23:07 IST)
ALSO READ: चेहऱ्यावर ग्लो हवा? महागडे प्रोडक्ट्स नकोत, या ५ सवयी लावा

1 त्वचा स्वच्छ करते -

ताक त्वचेच्या पृष्ठभागावरील घाण साफ करून बॅक्टेरियाच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. यासाठी एका भांड्यात 3 चमचे ताक, 1 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचे बदाम तेल मिक्स करा. आता त्यात थोडे गुलाब पाणी घालून मिक्स करा. आता या मिश्रणात कापसाचा गोळा बुडवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. शेवटी, पाण्याच्या मदतीने ते स्वच्छ करा.
 

2 सनटॅन काढते-

जर सनटॅनमुळे त्वचेला असमान टोनचा त्रास होत असेल तर ताकाचा वापर करा. या मध्ये लॅक्टिक ऍसिड समृद्ध असल्याने, ते नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून कार्य करतो. त्यामुळे तुमची त्वचा इव्हनटोन बनते. यासाठी ताक, मध आणि ताजे कोरफडीचे जेल घालून मऊ पेस्ट बनवा.आता या मिश्रणात गुलाबजल टाका आणि त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा. साधारण 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा.
ALSO READ: गुळाचा फेस पॅक त्वचेसाठी ठरेल फायदेशीर? जाणून घ्या फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत

3 तरुण त्वचा मिळते -

ताकामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते जी मुक्त रॅडिकल्सला काढून टाकते . तसेच, त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि एजिंग कमी करते. यासाठी मिक्सरमध्ये 2 चमचे ताक, एक मॅश केलेले केळे आणि एक चमचा मध घालून चांगले मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर जेंटल क्लिंझरने त्वचा स्वच्छ करा.
ALSO READ: ग्लोइंग स्किनसाठी महागड्या क्रिम्स नको; रात्री झोपण्यापूर्वी करा हे होममेड उपाय

4 कोंडा दूर करते -

 कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ताक वापरणे योग्य ठरू शकते. हे तुमच्या स्कॅल्प  ला हायड्रेशन देऊन कोंड्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. ते वापरण्यासाठी एका वाडग्यात ताक, बेसन आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून गुळगुळीत पेस्ट बनवा . आता ही पेस्ट तुमच्या स्कॅल्पवर आणि केसांच्या मुळांवर लावा. आता हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर 30 मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. कोंड्याचा त्रास नाहीसा होईल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

हिवाळ्यात गाजरापासून बनवता येणाऱ्या अतिशय पौष्टिक रेसिपी Healthy Carrot Recipes

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अणि महत्त्व जाणून घ्या

हृदयाचे आरोग्य जपायचे आहे? रोजच्या जीवनात करा हे महत्त्वाचे बदल

जपानी, जर्मन आणि फ्रेंच यांसारख्या भाषा शिकल्यास, तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात

पुढील लेख
Show comments