Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात फक्त आपल्या सौंदर्याची होईल चर्चा

Updated: शनिवार, 4 जानेवारी 2020 (14:17 IST)
 
चेहर्‍याची काळजी घेण्यासाठी मुळात रोज 6 ते 8 तास सलग झोप घ्या, यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणार नाहीत आणि तुमच्या हार्मोन्समध्ये संतुलन राखलं जाईल. त्याचप्रमाणे दिवसभरातून 12 ते 15 ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा उजळून निघेलच; शिवाय शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर पडतील. व्हिटॅन्सि आणि अँटी ऑक्सिडंट्‌सचा आहारात समावेश असू द्या.
 
पपई, पेरू, किवी, कलिंगड अशी रसदार आणि सी-व्हिटॅममिनयुक्त फळं खा. यामुळे त्वचेच्या पेशींचं विघटन होणार नाही. अंघोळीच्या वेळी साबण किंवा क्लिन्सिंग मिल्कपेक्षा अधूनधून गुलाबपाणी, मध, हळद, चंदन वापरा. त्यांची पेस्ट करून ती लावल्यावर मृत पेशी निघून जातील आणि त्वचेचा निखार आणखी वाढेल.
 
घरगुती फेस पॅक वापरा. तुळशीत असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणर्धांमुळे उन्हामुळे टॅन झालेली त्वचा तिच्या पूर्वरूपात येऊ शकते. तुळशीच्या पानांची पेस्ट आणि त्यात गुलाबपाणी, साखर आणि मध घालून ते कालवलेलं मिश्रण चेहर्‍यावर लावा.
 
10 मिनिटं हा फेसपॅक चेहर्‍यावर ठेवा. असं वारंवार केल्यानं काळवंडलेला चेहरा उजळून निघतो. तसंच, दुधात क्रश केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि तो लेप चेहर्‍यावर 20 मिनिटांसाठी लावा. कोमट पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळाहा पॅक लावल्यावर त्वचेतील कोरडेपणा निघून जातो.
 
फक्त चेहर्‍याच्या रंग, पोत यांचा विचार करत असताना अनेकदा खांदे आणि मान यांच्याकडे दुर्लक्ष होतं.  मीठ आणि लिंबू एकत्र करून खांदा आणि मान घासा. यामुळे त्वचेतील मृतपेशी निघून जातील.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा; त्वचेच्या टोननुसार योग्य प्रोडक्ट्स निवडा

वजन कमी करण्यासाठी नारळाचे पाणी प्या; शरीराला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

पोटावरील चरबी कमी करायची असेल, तर कुंभकासनाचा नियमाने सराव करा

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

उपवासासाठी एक उत्तम आणि चवदार रेसिपी ''Green Sabudana Vada''

पुढील लेख
Show comments