गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

हळद-बेसन
2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून घ्या. हे पॅक चेहरा, गळा आणि इतर प्रभावित भागांवर लावा आणि 20 मिनिट तसेच राहू द्या. नंतर स्क्रब करत हटवा. आठवड्यातून दोनदा वापरा.
 
लिंबाचा रस आणि गुलाबपाणी
1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा काकडीचा रस आणि 1 चमचा गुलाबपाणी मिसळा. टॅनिग होत असलेल्या जागेवर लावून 20 मिनिट तसेच राहू द्या. नंतर हलक्या पाण्याने मसाज करत स्वच्छ करा. दररोज हे पॅक वापरता येईल. याने टॅनिंग दूर होईल आणि हे सनस्क्रीनचे पर्याय म्हणून देखील उपयोगी पडेल.
 
एलोवेरा आणि टोमॅटो पॅक
1 चमचा मसूर डाळ पावडर, 1 चमचा टोमॅटो रस आणि 1 चमचा एलोवेरा रस मिसळून पेस्ट तयार करावी. अर्धा तास प्रभावित भागेवर लावून ठेवावी. नंतर स्क्रब करत ताज्या पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. आठवड्यातून दोनदा हे वापरू शकता. 
 
लिंबाच्या सालांचे पावडर एक चमचा दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर 10-25 मिनिट लावून राहून द्या. नंतर गार पाण्याने धुऊन टाका. हे पॅक आठवड्यातून 2-3 वेळा वापरता येईल. 
 
साखर आणि लिंबू
1 चमचा साखर, अर्धा चमचा ग्लिसरीन, 1 चमचा लिंबाचा रस मिसळून घ्या. स्क्रबप्रमाणे त्वचेवर मसाज करत लावा. 3 मिनिट स्क्रब करत राहा. नंतर पाण्याने धुऊन टाका. याने मृत त्वचा आणि टॅनिग दोन्हींपासून सुटका मिळेल.